Apmc market | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मका, सोयाबीनची आवक वाढली

Apmc market | जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरीप हंगामातील मका, उडीद, सोयाबीन, बाजरी यासारख्या धान्याची आवक वाढली आहे. मागणी चांगली असल्याच्या स्थितीत संबंधित सर्व शेतीमालाचे भावही तेजीत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. 20 ऑक्टोबर) मक्याची सर्वाधिक 1935 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजरीची 150 क्विंटल आवक झाली, बाजरीला 1925 ते 2400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संकरीत ज्वारीची 35 क्विंटल आवक होऊन 2051 ते 2800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. दादर ज्वारीची 1 क्विंटल आवक होऊन सरासरी 4600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. गव्हाची 35 क्विंटल आवक होऊन 2370 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. काळ्या उडीदाची 214 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 9000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सोयाबीनची 400 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 4650 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तिळाची 31 क्विंटल आवक होऊन 13,500 ते 14,500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हरभऱ्याची 7 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 9500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleJalgaon news | जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक नेहमीपेक्षा कमीच, भाव तेजीत
Next articlemaize market : मक्याला ‘या’ मार्केटमध्ये सर्वाधिक भाव, राज्यात दररोज 500 क्विंटलपर्यंत आवक