apmc market : जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारी 4500 रूपये प्रतिक्विंटल

apmc market : जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामापूर्वीच दादर म्हणजेच रब्बी ज्वारीचा भाव तेजीत आला आहे. हंगाम नसताना सध्या बाजार समितीत दैनंदिन सरासरी 100 क्विंटलपर्यंत रब्बी ज्वारीची आवक होत असून, तिला 4100 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

जळगावच्या बाजार समितीत बुधवारी (ता. 25 ऑक्टोबर) मक्याची सर्वाधिक 4651 क्विंटल आवक झाली, त्यास 1681 ते 2026 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजरीची 60 क्विंटल आवक झाली, बाजरीला 2200 ते 2380 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. गव्हाची 42 क्विंटल आवक झाली, त्यास 2353 ते 2708 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संकरीत ज्वारीची 5 क्विंटल आवक झाली, ज्वारीला 2600 ते 2645 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हरभऱ्याची 140 क्विंटल आवक झाली, त्यास 4750 ते 5175 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मूगाची 38 क्विंटल आवक झाली, त्यास 8526 ते 10,500 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उडीदाची 151 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 8250 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सोयाबीनची 338 क्विंटल आवक झाली, त्यास 4200 ते 4695 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleflower market : बाजारात झेंडुच्या फुलांची आवक घटली, दसरा- दिवाळीला भाव तेजीतच राहणार
Next articleOnion Market: कांदा किरकोळ बाजारात 50 रूपये किलो, अजून किती दिवस राहणार भाव तेजीत ?