राज्यातील कोणत्या बाजार समितीत मिळाला ? तुरीला 11,800 रूपये प्रतिक्विंटल भाव

Apmc price : राज्यात खरिपातील नवीन तुरीची आवक होण्यास अजून बराच अवधी बाकी आहे. दरम्यान, ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या जेवढी काही तुरीची आवक होत आहे, तिला व्यापाऱ्यांकडून ‘मुँह मांगा दाम’ दिला जातो आहे. तुरीला काही ठिकाणी तर जास्तीतजास्त 11 हजार 800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव सुद्धा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (ता.10 नोव्हेंबर) राज्यातील बुलडाणा आणि नागपूर येथील बाजार समित्यांमध्ये लाल तुरीची एकूण सुमारे 58 क्विंटल आवक झाली होती. पैकी बुलडाण्यात तुरीची 26 क्विंटल आवक झाली आणि तिला 9000 ते 11500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरातही तुरीची 32 क्विंटल आवक झाली, तिला 10000 ते 10650 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Tur in the market committees of the state 11,800 up to Rs

गुरूवारी (ता.09 नोव्हेंबर) राज्यभरात तुरीची सुमारे 902 क्विंटल आवक झाली होती. पैकी अकोला येथील बाजार समितीत लाल तुरीची 18 क्विंटल आवक झाली, तिला 10000 ते 11815 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अमरावतीमध्येही लाल तुरीची 142 क्विंटल आवक झाली, तिला 11250 ते 11577 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बुलडाण्यात लाल तुरीची 187 क्विंटल आवक झाली, तिला 8883 ते 11412 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जालन्यात तुरीची 115 क्विंटल आवक झाली, तिला 6100 ते 11051 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरात तुरीची 20 क्विंटल आवक झाली आणि 10100 ते 10500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नाशिकमध्ये तुरीची 4 क्विंटल आवक झाली आणि 10200 ते 10610 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वर्ध्यात तुरीची 110 क्विंटल आवक झाली आणि 10025 ते 11413 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वाशिममध्ये तुरीची 208 क्विंटल आवक झाली आणि 10250 ते 11348 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वाशिममध्येच तुरीची 60 क्विंटल आवक झाली, तिला 9500 ते 11400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleJalgaon Drought News: जळगाव जिल्ह्यात 14 तालुक्यांच्या 67 महसूली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
Next articleज्वारी, बाजरी, मक्याची किमान आधारभूत किंमतीने 01 डिसेंबरपासून सुरू होणार खरेदी