कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची केळी पीकविमा भरपाईबाबत मोठी घोषणा

Banana Crop Insurance : प्रतिकूल हवामानावर मात करीत केळीचे उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे. पीकविमा भरपाई प्रलंबित असलेल्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात सर्व रक्कम अदा केली जाईल. आतापर्यंत सुमारे 425 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित 96 कोटी रूपये फक्त प्रलंबित आहेत, असे मंत्री मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

Agriculture Minister made ‘this’ announcement regarding banana crop insurance compensation

विधान परिषदेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीकविमा भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर निवेदन केले. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी जेवढी केळी लागवड झाली होती, त्याच्या तुलनेत यंदा 130 टक्क्यांपेक्षा जास्त केळी लागवड झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. याच आकडेवारीचा आधार घेऊन संबंधित पीकविमा कंपन्यांनी भरपाईला तसेच पंचनाम्यांनाही आक्षेप घेतला आहे. परंतु, पीकविमा घेतलेल्या आक्षेप आता निकाली निघाला आहे. ज्या शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही त्यांना ती येत्या 15 दिवसात मिळेल. जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे 522 कोटी रूपायांची पीकविमा भरपाई मंजूर आहे. एखाद्या जिल्ह्यात एका पिकाच्या लागवडीत गेल्या हंगामाच्या तुलनेत 50 ते 130 टक्क्यांपर्यंतची वाढ गृहीत धरली जाते. त्यापेक्षा जास्त वाढ झाल्यास त्या आधारे अपील करण्याचा अधिकार पीकविमा कंपनीला मिळतो. त्यामुळेच जळगाव जिल्ह्यातील केळी पीकविमा भरपाईची तिढा यंदा निर्माण झाला आणि पुनर्सर्वेक्षण करण्याचे ठरले, असेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group
Previous articleजळगावच्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवाला मॉरिशसच्या शेतकऱ्यांची भेट
Next articleराज्यातील थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय, विदर्भ गारठला