Banana Market: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कच्च्या केळीला मिळतोय ‘इतका’ भाव

Banana Market: मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत कच्च्या केळीची राज्यभरातून होणारी आवक सर्वसाधारणच आहे. मागणी चांगली असल्याच्या स्थितीत मुंबईत आवक होत असलेल्या केळीला 2000 ते 3000 रूपये आणि सरासरी 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव गेल्या सप्ताहात मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, 25 ऑक्टोबरला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची 101 क्विंटल आवक झाली आणि भाव 2000 ते 3500 रूपये, सरासरी 2700 रूपये प्रतिक्विंटल होता. 26 ऑक्टोबरला केळीची 82 क्विंटल आवक झाली आणि भाव 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल होता. 27 ऑक्टोबरला केळीची आवक एकदम कमी म्हणजे फक्त 15 क्विंटलपर्यंत झाली. तिला भाव 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये प्रतिक्विंटलचा होता. 28 ऑक्टोबरला मात्र केळीची आवक वाढून 162 क्विंटलपर्यंत गेली, यावेळी केळीला भाव 2000 ते 3200 रूपये प्रतिक्विंटल होता. अशाच प्रकारे 30 ऑक्टोबरला पुन्हा केळीची आवक वाढून 261 क्विंटलपर्यंत पोहोचली, तिलाही भाव 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा होता. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी केळीची आवक घटून 28 क्विंटलपर्यंत खाली आली. तरी सुद्धा केळीचे भाव स्थिरच होते. यावेळीही केळीला 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 01 नोव्हेंबरला केळीच्या आवकेत आणखी सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. परंतू, भाव 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यानच स्थिर होते. अशा प्रकारे केळीच्या आवकेत बरेच चढ उतार होत असले तरी मुंबईत केळीला मिळणारा भाव हा स्थिरच राहिल्याचे निदर्शनास आले.

WhatsApp Group
Previous articleAgriculture News: नमो शेततळे अभियानातून शेतकऱ्यांना ‘इतक्या’ शेततळ्यांचा मिळेल लाभ
Next articleBanana Market Rate: गुजरात राज्यात सुरत मार्केटमध्ये केळीला मिळतोय सध्या ‘असा’ चांगला भाव