मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीच्या भावात पुन्हा तेजी

Banana Market : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोनच दिवसांपूर्वी केळीचे भाव 1000 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. मात्र, तिथे आता पुन्हा केळीच्या भावात तेजी निर्माण झाली असून, किमान व कमाल दरात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबई बाजार समितीत सध्या कच्च्या केळीची आवक खूपच अस्थिर आहे. त्यामुळे कदाचित त्याठिकाणी केळी भावात मोठे चढउतार अनुभवण्यास मिळत आहेत.

Banana prices rise again in Mumbai Agricultural Produce Market Committee

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 29 डिसेंबर) मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची जेमतेम 15 क्विंटलपर्यंत आवक झाली होती. मागणीनुसार पुरवठा नसल्याने अर्थातच केळीला 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आदल्या दिवशी गुरुवारी (ता.28 डिसेंबर) देखील मुंबईत केळीची सुमारे 123 क्विंटल आवक झाली होती आणि तिला 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. बुधवारी (ता.27 डिसेंबर) मुंबईत केळीला निच्चांकी 1000 ते 1400, सरासरी 1200 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.

दृष्टिक्षेपात मुंबईतील केळीचे भाव (प्रतिक्विंटल)
■ 29 डिसेंबर- 2000 ते 3000 रूपये
■ 28 डिसेंबर- 2000 ते 2600 रूपये
■ 27 डिसेंबर- 1000 ते 1400 रूपये
■ 26 डिसेंबर- 3000 ते 4000 रूपये
■ 25 डिसेंबर- 3000 ते 4000 रूपये

WhatsApp Group
Previous articleराज्यातील ‘इतक्या’ सिंचन प्रकल्पांना 18 हजार 399 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
Next articleदुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण होणार, वसुलीस स्थगिती