मुंबई बाजार समितीत केळीच्या दराने नव्या वर्षात केला मोठा धमाका

गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात तेजी निर्माण झाली असून, थंडीच्या दिवसातही तिथे केळी चांगली भाव खाताना दिसते आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता.01) देखील मुंबईत केळीला कमाल 3400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मुंबईत मिळाला.

Banana Market Mumbai : In the new year, the price of banana in Mumbai market committee made a big explosion

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारणपणे गुरुवार (ता. 28 डिसेंबर) पासून केळीच्या दराने चांगली उसळी घेतली आहे. गुरुवारी मुंबईत केळीला 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच केळीच्या दरात आणखी सुधारणा झाली होती. शुक्रवारी (ता. 29 डिसेंबर) केळीला त्याठिकाणी 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. सरत्या वर्षाचे शेवटचे दोन दिवस केळीचे व्यवहार झाले नाही. सोमवारी (ता.01 जानेवारी) मात्र नवीन वर्षाचा मोठा धमाका केळीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केला. तिथे सोमवारी कच्च्या केळीची 63 क्विंटल आवक झाली आणि तिला 2100 ते 3400, सरासरी 2700 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

दृष्टिक्षेपात मुंबईतील केळीचे दर (प्रतिक्विंटल)
● 01 जानेवारी- 2100 ते 3400 रूपये
● 29 डिसेंबर- 2000 ते 3000 रूपये
● 28 डिसेंबर- 2000 ते 2600 रूपये
● 27 डिसेंबर- 1000 ते 1400 रूपये

WhatsApp Group
Previous articleराजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलिंडरला 450 रूपयांचे अनुदान मिळणार
Next articleमंगळवारी (02 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव