केळीला केरळमध्ये रविवारी (ता.03) मिळाला 4500 रूपये प्रतिक्विंटल भाव

Banana Market Rate : तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक ही केळी उत्पादित करणारी प्रमुख राज्ये असली तरी, संपूर्ण देशात केळीला कायम मागणी असते. मोसम कोणताही असो देशाच्या कानाकोपऱ्यात केळी नेहमीच कमी-अधिक फरकाने भाव खाताना दिसते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आताही केरळ राज्यात काही ठिकाणी केळीला सुमारे 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव आहे.

Banana fetched Rs 4500 per quintal in Kerala on Sunday (03)

केळी उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रासह देशातील प्रमुख काही बाजारांमधील शेतीमालाचे ताजे भाव उपलब्ध करून देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. त्यानुसार आज आम्ही केरळ, ओडिशा, तेलंगणा, उत्तरप्रदेशातील काही बाजारांमधील कच्च्या केळीचे ताजे भाव देत आहोत. रविवारी (ता. 03 डिसेंबर) केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात केळीला सर्वाधिक 4000 ते 4500 रूपये आणि सरासरी 4200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. ओडिशा राज्यातील बोलंगीर जिल्ह्यात कांताबाजी येथेही केळीला 3000 ते 4000 रूपये आणि सरासरी 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मात्र, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात रामक्रिस्नापूरम येथे केळीला सरासरी फक्त 900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. उत्तरप्रदेशातील सहरानपूर जिल्ह्यात देवबंद येथे रविवारी केळीला 1000 ते 1300 रूपये, सरासरी 900 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. उत्तर प्रदेशातीलच बिजनोर जिल्ह्यात कीरतपूर येथे कच्च्चा केळीला 1400 ते 1500 रूपये, सरासरी 1450 रूपये प्रतिक्विंटल भाव होता.

केळीला शनिवारी त्रिपुरामध्ये होता 6000 रू. प्रतिक्विंटलचा भाव

प्राप्त माहितीनुसार त्रिपुरा राज्यात शनिवारी (ता. 2 डिसेंबर) कच्च्या केळीला बोक्सोनगर येथे 4000 ते 6000 रूपये, सरासरी 5000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. अशाच प्रकारे सोनामुरा येथे 4000 ते 6000 रूपये, सरासरी 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. तर दुसरीकडे साऊथ डिस्ट्रीक्टमध्ये बायोखोरा येथे केळीला 1600 ते 2000 रूपये आणि सरासरी 1800 रूपये प्रतिक्विंटल भाव होता.

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांनो पीकविमा काढला का ? फक्त दोन दिवसांची आहे मुदतवाढ
Next articleउद्या सोमवारी (ता.04 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव.