जाणून घ्या, सुरत बाजार समितीमध्ये सध्या कसे आहेत केळीचे भाव ?

Banana Market Rate : गुजरात राज्यात सर्वाधिक उलाढाल असणाऱ्या सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत असलेल्या कच्च्या केळीचे भाव आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या सुरतमध्ये जेवढी काही केळीची आवक होत आहे, तिचे भाव काहीअंशी दबावातच आहेत. तरीही त्याठिकाणी केळीला सरासरी 1500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळताना दिसत आहे.

Know, how are the prices of bananas in the Surat market committee?

प्राप्त माहितीनुसार, 18 डिसेंबरला सुरतमध्ये केळीचा भाव 1000 ते 2100, सरासरी 1550 रूपये प्रतिक्विंटल होता. 19 डिसेंबरलाही 1000 ते 2100, सरासरी 1550 रूपये प्रतिक्विंटचा भाव कायम होता. त्यानंतर 20 डिसेंबरला केळीचे भाव थोडे कमी होऊन 1000 ते 2000, सरासरी 1500 रूपये प्रतिक्विंटल झाले. त्यात आजतागायत कोणतीही वाढ अथवा घट झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यानुसार सुरत बाजार समितीमध्ये 21 डिसेंबरला तसेच 22 डिसेंबरला केळीचे भाव 1000 ते 2000, सरासरी 1500 रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिर होते.

दृष्टिक्षेपात सुरतमधील केळीचे भाव (प्रतिक्विंटल)
● 22 डिसेंबर- 1000 ते 2000 रूपये
● 21 डिसेंबर- 1000 ते 2000 रूपये
● 20 डिसेंबर- 1000 ते 2000 रूपये
● 19 डिसेंबर- 1000 ते 2100 रूपये
● 18 डिसेंबर- 1000 ते 2100 रूपये

WhatsApp Group
Previous articleविदर्भ, मराठवाडा वगळता उर्वरित राज्यातील थंडीवर ढगाळ वातावरणाचा परिणाम
Next articleउद्या शनिवारी (ता. 23 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव