मुंबई बाजार समितीत केळीचे भाव दोनच दिवसात निम्म्याहून कमी झाले

Banana Market Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस कच्च्या केळीला सुमारे 3000 ते 4000, सरासरी 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यात तिसऱ्या दिवशीही सातत्य राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना, बुधवारी (ता.27) पुन्हा केळीचे भाव निम्म्याहून कमी झाले.

In the Mumbai market committee, the price of banana fell by half in just two days

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.27) केळीची जेमतेम 15 क्विंटल आवक झाली होती. आवक जेमतेमच असली तरी यादिवशी अपेक्षित उठाव नसल्याने केळीला 1000 ते 1400, सरासरी 1200 रूपये प्रतिक्विंटल इतकाच भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात आला. आदल्या दिवशी मंगळवारी (ता.26) ज्या केळीला 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता, तिथे दुसऱ्या दिवशी निम्म्याहून कमी भाव केळीला मिळाला. गेल्या पंधरवड्यात केळीला मिळालेला हा सर्वात निच्चांकी भाव आहे. बाजार समितीमधील तेजीचे अचानक मोठ्या मंदीत रूपांतर झाल्याचे पाहुन शेतकरी वर्ग देखील चक्रावून गेला.

दृष्टीक्षेपात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केळीचे भाव (प्रतिक्विंटल)

● 27 डिसेंबर- 1000 ते 1400 रूपये
● 26 डिसेंबर- 3000 ते 4000 रूपये
● 25 डिसेंबर- 3000 ते 4000 रूपये
● 23 डिसेंबर- 1400 ते 3000 रूपये

WhatsApp Group
Previous articleकापूस उत्पादकांना फसविणाऱ्या जग्गू डॉनकडून जळगाव जिल्ह्यातही जिनिंगसाठी कोट्यवधींचा सौदा
Next articleशास्त्रज्ञांकडून इलेक्ट्रॉनिक माती विकसित, आता ही काय नवीन भांडगड आहे ?