Banana Market Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरापासून केळीची आवक घटली आहे. त्याठिकाणी मागणीनुसार पुरवठा नसल्याने केळीचे भाव देखील त्यामुळे काहीअंशी तेजीत आणि स्थिर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी (ता.09) सुद्धा मुंबईत केळीला सरासरी 2200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.09 जानेवारी) केळीची जेमतेम 15 क्विंटल आवक झाली होती. या केळीला 2000 ते 2500, सरासरी 2200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. तत्पूर्वी सोमवारी (ता.08) देखील मुंबईत केळीची 41 क्विंटल आवक झाली होती आणि 2000 ते 2500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. शनिवारी (ता.06) केळीची 29 क्विंटल आवक झाली होती आणि 2500 ते 3000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. शुक्रवारी (ता.05) केळीची फक्त 04 क्विंटल आवक झाली होती आणि 2500 ते 3000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मुंबईत गुरूवारी (ता.04) केळीची 135 क्विंटल आवक होऊन 1500 ते 2000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, त्यानंतर केळीच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली.
मुंबईमधील केळीचे भाव (प्रति क्विंटल)
● 09 जानेवारी- 2000 ते 2500 रूपये
● 08 जानेवारी- 2000 ते 2500 रूपये
● 06 जानेवारी- 2500 ते 3000 रूपये
● 05 जानेवारी- 2500 ते 3000 रूपये
● 04 जानेवारी- 1500 ते 2000 रूपये