मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीच्या दरात पुन्हा तेजी…!

गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीची आवक जेमतेम परंतु कमी अधिक प्रमाणात होत आहे. मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत साहजिक तिथे केळीला दर देखील चांगले मिळाले आहेत. गेल्या आठवडाभरात केळीला मुंबई बाजार समितीत सरासरी 3300 ते 3500 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला असून, थोड्याफार फरकाने केळीचे दर स्थिरच आहेत. ( Banana Market Rate)

मुंबई बाजार समितीमधील केळीचे दर (प्रति क्विंटल)
● 16 जानेवारी- 3000 ते 3600, सरासरी 3300 रूपये
● 15 जानेवारी- 3000 ते 3600, 3300 रूपये
● 13 जानेवारी- 3000 ते 4000, 3500 रूपये
● 12 जानेवारी- 3000 ते 4000, 3500 रूपये
● 11 जानेवारी- 1600 ते 2200, 1900 रूपये

WhatsApp Group
Previous articleसेंद्रिय शेतीवर शुक्रवारी कार्यशाळा, शरद पवारांची खास उपस्थिती
Next articleगुरूवारी (18 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव