गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीच्या आवकेत खूपच चढ-उतार अनुभवण्यास मिळत आहेत. मात्र, तिथे केळीचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिरच आहेत. त्यात दखल घेण्यासारखी वाढ अथवा घट झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात मुंबई बाजार समितीत केळीला सरासरी 2100 ते 2200 रूपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाले आहेत. (Banana Market Rate)
मुंबई बाजार समितीमधील केळीचे भाव (प्रति क्विंटल)
23 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये
22 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये
20 जाने- 1900 ते 2500, सरासरी 2200 रूपये
19 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये
18 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये
17 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)