गावशिवार न्यूज | गुजरात राज्यात सर्वाधिक उलाढाल असलेल्या सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीचे भाव हे कमी-अधिक फरकाने स्थिरच आहेत. त्यात गेल्या आठवडाभरात फार चढ उतार दिसून आलेले नाहीत. प्राप्त माहितीनुसार सुरतमध्ये गुरूवारी (ता. 25 जानेवारी) देखील केळीला 1000 ते 2400, सरासरी 1700 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. (Banana Market Rate)
सुरतमधील केळीचे किमान व कमाल भाव
● 25 जानेवारी- 1000 ते 2400 रूपये
● 24 जानेवारी- 1000 ते 2500 रूपये
● 23 जानेवारी- 1000 ते 2500 रूपये
● 22 जानेवारी- 1000 ते 2500 रूपये
● 20 जावेवारी- 1000 ते 2500 रूपये
● 19 जानेवारी- 1000 ते 2000 रूपये
● 18 जानेवारी- 1000 ते 2000 रूपये
● 17 जानेवारी- 1000 ते 2000 रूपये
● 16 जानेवारी- 1000 ते 2000 रूपये