गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून केळीच्या आवकेत मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. मात्र, सध्या जेवढी काही केळीची आवक होत आहे त्यास चांगले भाव मिळाले आहेत. 25 जानेवारीला मुंबईत केळीला विक्रमी 4000 ते 5000, सरासरी 4500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर केळीचे भाव थोडे खालावले असले तरी आजही सरासरी 2700 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे केळी तिथे विकली जात आहे. (Banana Market Rate)
मुंबई बाजार समितीमधील केळीचे भाव
● 30 जाने- 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये
● 29 जाने- 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये
● 25 जाने- 4000 ते 5000, सरासरी 4500 रूपये
● 24 जाने- 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये
● 23 जाने- 1800 ते 2400, सरासरी 2100 रूपये