गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून कच्च्या केळीची आवक आणि भाव स्थिरच होते. मात्र, सोमवारी (ता. 05) आवक वाढल्यानंतरही केळीचे भाव किमान 3000 रूपये, कमाल 4000 रूपये आणि सरासरी 3500 रूपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. शनिवारच्या तुलनेत केळीच्या भावात जवळपास 1000 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. (Banana Market Rate)
मुंबई बाजार समितीमधील केळीचे भाव (प्रति क्विंटल)
➡️ 05 फेब्रु- 3000 ते 4000, सरासरी 3500 रूपये
➡️ 03 फेब्रू- 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये
➡️ 02 फेब्रू- 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये
➡️ 01 फेब्रू- 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये
➡️ 31 जाने- 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये
➡️ 30 जाने- 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये