Banana Rate : अबब…मुंबई बाजार समितीमध्ये केळीला 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव

Banana Rate : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवाळी, भाऊबीज, पाडवा आणि छटपुजेमुळे केळीच्या भावात निर्माण झालेली तेजी अजुनही कायमच आहे. विशेषतः मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कच्ची केळी चांगलीच भाव खात असून, त्याठिकाणी केळीला कमाल 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव सुद्धा मिळाला आहे. शनिवार (ता.18 नोव्हेंबर) पासून प्रामुख्याने केळीचे भाव चढते राहिले आहेत.

3500 rupees per quintal rate for banana in Mumbai market committee

गेल्या आठवडाभरात मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या केळीच्या आवकेमध्ये खूपच चढउतार अनुभवायला मिळाले. मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत अर्थातच केळीला चांगले भाव तिथे मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, 13 नोव्हेंबरला मुंबईत केळीची 226 क्विंटल आवक झाली होती आणि 2000 ते 2600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 14 नोव्हेंबरला तिथे केळीची फक्त 15 क्विंटल आवक झाली होती आणि भाव 2000 ते 2600 रूपये प्रतिक्विंटल होता. 15 नोव्हेंबरला मुंबईत केळीची 78 क्विंटल आवक झाली आणि भाव 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल होता. 16 नोव्हेंबरला तिथे केळीची जेमतेम 09 क्विंटल आवक झाली होती आणि भाव 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल होता. 17 नोव्हेंबरला केळीची आवक वाढून सुमारे 222 क्विंटलपर्यंत गेली होती आणि भाव 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल होता. 18 नोव्हेंबरला पुन्हा केळीची आवक घटून फक्त 9 क्विंटल झाली. यावेळी केळीला भाव 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल होता. 20 नोव्हेंबरला केळीची आवक वाढून 308 क्विंटलपर्यंत गेली होती. प्रत्यक्षात आवक जास्त असतानाही केळीला तिथे भाव 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल मिळाला. 21 नोव्हेंबरलाही केळीची 98 क्विंटलपर्यंत झाली आणि भाव 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल मिळाला.

WhatsApp Group
Previous articleGovernment Resolutions : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री.पाशा पटेल यांना मंत्रिपदाचा दर्जा
Next articleBanana Rate : उद्या बुधवारी (ता. 22 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव