Banana Rate : केळीला गुजरातच्या सुरत बाजार समितीत मिळतोय सध्या असा भाव

Banana Rate : गुजरात राज्यात सुरत येथे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीनंतर केळीच्या भावात फार तेजी दिसून आलेली नाही. मात्र, तिथे सध्या जेवढी काही केळीची आवक होत आहे, त्या मालाचे भाव सध्या स्थिरच आहेत आणि त्यात लक्षणीय अशी घट किंवा वाढ दिसलेली नाही.

Bananas are currently getting such a price in Surat Bazaar Committee of Gujarat

प्राप्त माहितीनुसार, सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी म्हणजेच 10 नोव्हेंबरला केळीला 1200 ते 2750 रूपये आणि सरासरी 1975 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 11 नोव्हेंबरला सुद्धा तिथे केळीला 1200 ते 2700 रूपये आणि सरासरी 1950 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. दिवाळीच्या काळात काही दिवस सुरतमध्ये केळीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. 16 नोव्हेंबरला पुन्हा व्यवहार सुरळीत झाल्यावर केळीला 1500 ते 2750 रूपये आणि सरासरी 2125 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 17 नोव्हेंबरला सुद्धा 1500 ते 2750 रूपये व सरासरी 2125 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 18 नोव्हेंबरला मात्र सुरतमध्ये केळीला 1500 ते 2800 रूपये व सरासरी 2150 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 20 नोव्हेंबर पुन्हा केळीचे भाव पूर्ववत होऊन 1500 ते 2750 रूपये प्रतिक्विंटल झाले. 21 नोव्हेंबरलाही तिथे केळीचा भाव 1500 ते 2750 रूपये व सरासरी 2125 रूपये प्रतिक्विंटल कायम राहिला.

WhatsApp Group
Previous articleCow Milk Rate : गायीच्या दुधाला 30 रूपये प्रतिलिटर दर, शासनाचे परिपत्रक केराच्या टोपलीत
Next articleSuccess Story : घरच्यांचा विरोध पत्करून घेतल्या म्हशी…उच्चशिक्षित तरूणावर आज वेळ आली अशी