Banana Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीची आवक खूपच अस्थिर आहे. मात्र, तिथे सध्या जेवढी काही केळीची आवक होत आहे तिला दर बऱ्यापैकी मिळताना दिसत आहे. बुधवारी (ता. 14) देखील मुंबईत केळीची 214 क्विंटल आवक झाली आणि 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एरवी केळीला सरासरी 2500 रूपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. मात्र, 09 आणि 10 फेब्रूवारीला केळीच्या दरात तिथे मोठी घसरण होऊन सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले होते. सुदैवाने 12 फेब्रुवारीपासून पुन्हा मुंबईत केळीचे दर सुधारले असून, सरासरी 2700 रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
मुंबई बाजार समितीमधील केळीचे दर (प्रति क्विंटल)
➡️ 14 फेब्रू- 2400 ते 3000, सरासरी 2700 रूपये
➡️ 13 फेब्रू- 2000 ते 2400, सरासरी 2200 रूपये
➡️ 12 फेब्रू- 2000 ते 2400, सरासरी 2200 रूपये
➡️ 10 फेब्रू- 1500 ते 2500, सरासरी 2000 रूपये
➡️ 09 फेब्रू- 1600 ते 2400, सरासरी 2000 रूपये
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)