Banana Rate Today : मागणी आणि पुरवठा यांचा बाबींचा मोठा प्रभाव शेतीमालाच्या बाजारभावावर नेहमीच पडत असतो. केळीच्या बाबतीत देखील तोच अनुभव सध्या येत असून, केरळ सारख्या राज्यात कच्च्या केळीचे भाव 4000 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचल्याचे दिसून आले आहे.
Know, how is the current market price of bananas in Kerala?
केरळमधील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या कन्नूर जिल्ह्यात शनिवारी (ता. 16 डिसेंबर) कच्च्या केळीला सर्वाधिक 4000 ते 4500 आणि सरासरी 4200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. त्रिस्सूर जिल्ह्यातील केळीला शनिवारी सरासरी 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अलाप्पुजा जिल्ह्यात केळीला 3000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुसरीकडे वायनाड जिल्ह्यात मात्र केळीला 1700 ते 1800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. तिरूवअनंथापुरम जिल्ह्यात केळीला 3300 ते 4000, सरासरी 3600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कोट्टयाम जिल्ह्यात 3100 ते 4000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कमी अधिक फरकाने केरळमधील इतर ठिकाणच्या बाजारपेठांमध्येही कच्च्या केळीचे भाव वरील प्रमाणेच भाव खाऊन होते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)