भाजपच्या 12 खासदारांचा राजीनामा; केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचाही समावेश

BJP MP Resigns : भाजपच्या 12 खासदारांनी आज बुधवारी (ता.06) त्यांचे राजीनामे लोकसभा अध्यक्षांकडे तडकाफडकी सादर करून मोठी खळबळ उडवून दिली. राजीनामे देणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अन्य एका राज्यमंत्र्याचाही समावेश आहे. राजीनामा देणारे सर्व खासदार काही राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत.

Along with 12 BJP MPs, Union Agriculture Minister Narendra Singh Tomar also resigned

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच तेलंगणात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपने तब्बल 21 खासदारांना तिकीट देऊन उतरविले होते. त्यापैकी 12 खासदार भरघोस मतांनी विजयी सुद्धा झाले आहेत. विजयी झालेल्या सर्व खासदारांनी बुधवारी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. भाजपने केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनाही विधानसभेचे तिकीट दिले होते. विजयी झाल्यानंतर दोन्ही मंत्र्यांना त्यामुळे खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे. साहजिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची व लोकसभा सदस्यांची संख्या कमी झाली आहे. तोमर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कृषीमंत्री पदावर आता कोणाला संधी मिळते, त्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसभेचा राजीनामा देणाऱ्या खासदारांमध्ये यांचा आहे समावेश
दरम्यान, लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या खासदारांमध्ये मध्यप्रदेशातील खासदार राकेश सिंह, उदय प्रताप, रिती पाठक तसेच छत्तीसगडमधून अरूण साव, गोमती साई, राजस्थानमधून राजवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीणा यांचाही समावेश आहे.

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नासाठी विरोधकांचा शासनाच्या चहापानावर बहिष्कार
Next articleउद्या गुरूवारी (ता.07 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव.