पुण्यात नवीन उडदाला सर्वाधिक 9850 रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव

जळगाव । गावशिवार न्यूज । पावसाच्या तडाक्यात सापडल्याने राज्यभरात काढणीवर आलेल्या उडीद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, काही बाजार समित्यांमध्ये हंगामावर होणारी उडदाची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत पावसाच्या तडाक्यातून वाचलेल्या चांगल्या दर्जाच्या मालाचे बाजारभाव सुद्धा तेजीत दिसून येत आहे. दरम्यान, पुण्यात उडदाला सर्वाधिक 9850 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

प्राप्त माहितीनुसार पुण्यात उडदाची सद्यःस्थितीत जेमतेम चार ते पाच क्विंटल दैनंदिन आवक होत असून, त्याला 8800 ते 10900 आणि सरासरी 9850 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जालन्यात 104 क्विंटल आवक झाली, त्याला 7700 ते 9221 रुपये, सरासरी 9000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जळगावमध्ये 129 क्विंटल आवक झाली, त्यास 8000 ते 8600 रुपये आणि सरासरी 8500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अक्कलकोट येथे मात्र उडदाची चांगली आवक दिसून आली. तिथे सुमारे 630 क्विंटल आवक होऊन, 8800 ते 9350 रुपये आणि सरासरी 9000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापुरातही 535 क्विंटलपर्यंत आवक झाली, त्यास 8005 ते 9185 रुपये आणि सरासरी 9015 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कल्याणमध्ये जेमतेम 3 क्विंटल आवक झाली, त्यास 9200 ते 9400 रुपये आणि सरासरी 9300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जामखेडला 1070 क्विंटल आवक झाली, त्यास 8500 ते 8900 रुपये आणि सरासरी 8700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुधणीत 465 क्विंटल आवक झाली, त्यास 7500 ते 9220 आणि सरासरी 8800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तुळजापुरला 75 क्विंटल आवक झाली, त्यास 8000 ते 8911 रुपये आणि 8500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. माजलगावला 13 क्विंटल आवक झाली, त्यास 7500 ते 5650 रुपये आणि सरासरी 8550 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कारंजा मार्केटला फक्त 7 क्विंटल आवक झाली, त्यास 6455 ते 9851 रुपये आणि सरासरी 6455 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर जिल्ह्यातील कर्जतला उडदाची 858 क्विंटल आवक झाली, त्यास 8000 ते 9000 आणि सरासरी 8700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दौंड केडगावला उडदाची 10 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 8900 रुपये आणि सरासरी 8200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये टोमॅटोला सर्वाधिक 18 रुपये प्रतिकिलोचा दर
Next articleमहाराष्ट्रात बटाटा 1050 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल