साखरेचे दर पडू लागल्याने कारखान्यांना आणखी मोठा धक्का

Breaking News : केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वापरण्यास बंदी घातल्याने आधीच राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या होत्या, त्यात बाजारातील साखरेचे दर आता पडू लागले आहेत. विपरित परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या साखर कारखान्यांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

Factories are hit harder as sugar prices start to fall

प्राप्त माहितीनुसार दिवाळीच्या सणाला मागणी वाढल्याने साखरेचे दर 3700 ते 3800 रूपये प्रतिक्विंटल दरम्यान होते. नंतरच्या कालावधीतही साखरेच्या दरात फार चढउतार अनुभवण्यास मिळाले नव्हते. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्यानंतर साखरेचे दर खऱ्या अर्थाने घसरले आहेत. साखरेच्या दरात दररोज घसरण होत असल्याने कारखानदारांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. साखरेला आताच 3500 ते 3600 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती संदर्भात जारी केलेला आदेश तातडीने मागे न घेतल्यास कदाचित साखरेचे दर आणखी खाली येतील. उत्पादन खर्चाचा विचार करता साखरेचे दर जास्तच खाली आल्यानंतर कोणत्याच कारखान्याला बाजारात साखर विक्रीसाठी काढणे परवडणार नाही. दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यापारी कमीत कमी भावात साखर कशी खरेदी करता येईल त्यासाठी शक्य तेवढी घासाघीस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे कंबरडेच मोडणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडण्यासह त्यांना तोडलेल्या उसाचे पेमेंट वेळेवर मिळण्याच्या बाबतीतही पुढे जाऊन मोठी समस्या उभी राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजिच पवार यांनी केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून साखर कारखान्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात केंद्राकडून अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांनाच भेट देणार केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक
Next articleमुंबई बाजार समितीत ज्वारीला 7500 रू. प्रतिक्विंटल मिळाला भाव