ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा उत्साहात

Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा ममुराबाद (जि.जळगाव) येथे मंगळवारी (ता.12) उत्साहात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांच्या या पुतळ्याचे लवकरच अनावरण केले जाणार आहे.

The arrival of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue in Mamurabad was celebrated with enthusiasm

ममुराबाद येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचे स्वप्न ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाहत होते. अखेर स्मारक समितीच्या माध्यमातून लोकवर्गणी जमा करून त्यास आता मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. सुमारे 12 फूट उंची असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा मंगळवारी वाजतगाजत ममुराबाद गावात दाखल झाला. दरम्यान, जळगाव रस्त्यावरील बायपास महामार्गापासून ममुराबाद गावापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात ममुराबादसह परिसरातील अनेक शिवप्रेमी नागरिक तसेच स्मारक समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यानिमित्त ममुराबाद गावातील वातावरण संपूर्ण भगवामय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष उमेश पाटील आणि सर्व सदस्य, ममुराबाद ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत चौधरी व उपसरपंच आरती पाटील, माजी सरपंच महेश चौधरी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच पोलिस पाटील आशा पाटील यांच्यासह विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन व संचालक यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.

WhatsApp Group
Previous articleउद्या बुधवारी (ता.13 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next article500 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यात प्रथम