ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जळगाव जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह

Children of sugarcane workers : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल तालुक्यात स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 क्षमतेची एकूण सहा वसतिगृह संत भगवानबाबा योजनेंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी 9200 क्षेत्रफळाची इमारत भाडेतत्त्वावर देऊ इच्छिणाऱ्या मालकांनी, व्यक्तींनी 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

A government hostel will be opened in Jalgaon district for the sons and daughters of sugarcane workers

सामाजिक न्याय विभागाच्या 15 जून 2021 च्या शासन निर्णयान्वये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना” सुरु करण्यात आली आहे. त्यात मुलांसाठी 41 आणि मुलींसाठी 41 अशी एकूण 82 (प्रत्येकी 100 क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यापैकी प्रथम टप्प्यात मुलांसाठी 10 तसेच मुलींसाठी 10 अशी एकूण 20 वसतीगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारची वसतीगृहे सध्या औरंगाबाद व नाशिक या विभागातील अहमदनगर, जालना, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. आता उर्वरीत 31 मुलांची व 31 मुलींची अशी एकूण 62 शासकीय वसतीगृहे प्रस्तावित आहेत. त्यापैकी जळगांव जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह एरंडोल, चाळीसगांव, यावल, या ठिकाणी प्रत्येकी 100 क्षमतेची असे प्रत्येकी 02 वसतीगृह सुरु करण्याकरीता (शासन मंजुरीच्या अधिन राहून) इमारत भाडेतत्वावर घेणेसाठी इमारत बांधकाम 9200 क्षेत्रफळ (चौ.फुट) सर्व सोयी-सुविधायुक्त शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यालय/महाविद्यालयापासून जवळ असलेली इमारत भाडेतत्वावर देणेसाठी उपलब्ध असल्यास 13 मार्च 2023 च्या शासन परिपत्रकातील अटीच्या अधीन विहित नमुन्यात आपले इमारत भाडेतत्वावर देणेबाबतचा प्रस्ताव अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगांव या कार्यालयास सादर करण्यात यावे, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत केळीची आवक घटली, भाव मात्र स्थिर
Next articleममुराबादच्या कृषी विज्ञान केंद्रात निविष्ठा विक्रेत्यांचा पदविका प्रदान समारंभ