महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग, जैन इरिगेशनची शेडनेटमध्ये केळी लागवड

Climate Smart Precision Farming of Banana : प्रतिकूल हवामानामुळे संकटांची मालिका पिच्छा सोडत नसल्याने बहुतांश सर्व केळी उत्पादक शेतकरी काही वर्षात पार मेटाकुटीला आले आहेत. त्यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे शेडनेटमधील केळीच्या बागेचे अनोखे मॉडेल जळगावच्या जैन हिल्सवर सध्या उभारण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या केळी लागवडीपेक्षा जरा हटके असलेली ही केळीची शेती शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत आहे.

what do you say Two seasons in 18 months from a banana garden in Shednet !

सुमारे 50 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीची लागवड करून राज्यातील एकूण केळी उत्पादनात जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण केळी उत्पादनात सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा एकटा जळगाव जिल्हा उचलतो. गेल्या काही वर्षात निर्यातक्षम केळी उत्पादनात आघाडी घेतल्याने विदेशातही जळगावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ही एक मोठी उपलब्धी असली तरी एकूणच जळगाव जिल्ह्यास समृद्ध बनविणारे हे पीक आता मोकळ्या वातावरणात वाढविणे मोठे जिकीरीचे ठरते आहे. गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, वाढते तापमान, अति थंडी, करपा व चरका तसेच सीएमव्ही, पनामा अशा रोगांनी केळी बागा उद्धवस्त होण्यास सुरूवात झाली आहे. ज्या काही शेतकऱ्यांना केळीच्या बागांनी आर्थिक सुबत्ता देऊन स्थिरस्थावर केले व मानसन्मान दिला, त्या शेतकऱ्यांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. हे चित्र लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातून केळीचे पीक नामशेष होते की काय, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

शेडनेटमधील केळीची शेती देईल शाश्वत उत्पादन
यापार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशनने वातावरण बदलाच्या परिस्थितीत केळीपासून शाश्वत उत्पादन देऊ शकणारा केळी बागेचा सक्षम पर्याय शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स परिसरात साकारला आहे. ‘क्लायमॅट स्मार्ट प्रिसिजन फार्मिंग ऑफ बनाना’, ही शेडनेटमधील केळीची नवीन संकल्पना सुरूवातीला खर्चिक वाटत असली तरी त्यापासून आगामी काळात मिळणाऱ्या शाश्वत व अधिक उत्पन्नाची खात्री लक्षात घेता होणारा खर्च हा लागलीच वसूल होण्याची खात्री सुद्धा आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यासंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन केले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जैन हिल्सवरील हायटेक कृषी महोत्सवाच्या निमित्ताने केले जात आहे. येत्या 14 जानेवारीपर्यंत शेतकरी केळीच्या या नाविन्यपूर्ण शेतीला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतील.

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषी महोत्सव : रविशंकर चलवदे
Next articleपुणे येथून छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी लागतील फक्त 2 तास