Cotton Market Rate: महाराष्ट्रातील ‘या’ बाजार समित्यांमध्ये कापसाला मिळाला आहे ‘इतका’ भाव

Cotton Market Rate: महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळूहळू कापसाची आवक वाढू लागली आहे. सध्या विशेषतः विदर्भात जास्तकरून कापूस विक्रीसाठी येत असून, त्यास गुणवत्तेनुसार व्यापाऱ्यांकडून भाव दिला जात आहे. तरीही कापसाला गेल्या सप्ताहात जास्तीतजास्त 7300 रूपये प्रतिक्विंटलच्या आतच भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता. 04 नोव्हेंबर) नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे कापसाची जेमतेम 61 क्विंटल आवक झाली, त्यास 7140 ते 7270 रुपये आणि सरासरी 7230 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोर्पना येथे कापसाची सुमारे 873 क्विंटल आवक झाली, त्यास 6500 ते 7000 रुपये आणि सरासरी 6550 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Cotton Rates In Maharashtra APMC

शुक्रवारी (ता. 03 नोव्हेंबर) सावनेर बाजार समितीत कापसाची तब्बल 1000 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7150 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. समुद्रपूर येथे कापसाची 616 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मारेगाव येथे 176 क्विंटलची आवक झाली, त्यास 6890 ते 7090 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कळमेश्वर येथे 1138 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 7200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उमरेड येथे कापसाची 151 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7260 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वरोरा येथे कापसाची 403 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 7254 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वरोरा-माढेली येथे कापसाची 210 क्विंटल आवक झाली, त्यास 6900 ते 7151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. काटोल येथे कापसाची फक्त 6 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 7150 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कोर्पना येथे कापसाची 128 क्विंटल आवक झाली, त्यास 6200 ते 6900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. किल्ले धारूर येथे कापसाची 308 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 7206 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. हिंगणघाट येथे कापसाची 800 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 7200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. वर्ध्यात कापसाची 635 क्विंटल आवक झाली, त्यास 7150 ते 7200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पुलगावात कापसाची 289 क्विंटल आवक झाली, त्यास 6900 ते 7200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleBanana Market Rate: गुजरात राज्यात सुरत मार्केटमध्ये केळीला मिळतोय सध्या ‘असा’ चांगला भाव
Next articleSoyabean Market Rate: राज्यात सोयाबीनची आवक वाढली, ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक भाव