Cotton Market Rate : गेल्या वर्षीच्या हंगामात अखेरपर्यंत कापसाच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली होती. यंदाच्या हंगामातही उत्पादित कापसाच्या भावात अजूनपर्यंत तरी म्हणावी तशी तेजी निर्माण झालेली नाही. सद्यःस्थितीत सर्वदूर कापसाचे भाव काहीसे दबावातच दिसत आहेत. अशा या परिस्थितीत मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मात्र कापसाला सर्वाधिक 9100 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
Cotton got the highest price of Rs 9100 per quintal in ‘which’ state?
कापूस उत्पादन घेणाऱ्या देशातील काही प्रमुख राज्यातील कापसाच्या भावाचा आढावा आज आपण घेणार आहोत. रविवारी (ता.17 डिसेंबर) तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात हलिया येथे कापसाला 7020 ते 7020 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. याशिवाय वारांगल जिल्ह्यातील नरसामपेट येथे कापसाला 5300 ते 6600 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. मेडक जिल्ह्यातील गजवेल येथे 6600 ते 6800 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. हरयाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यात कापसाला 5500 ते 6500 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात DCH-32 वाणाच्या कापसाला सर्वाधिक 6011 ते 9100 रूपये प्रतिक्विंटल भाव होता, तसेच इतर वाणाच्या कापसाला 6900 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. बडवानी जिल्ह्यातील खेतिया येथेही एच 4 कापसाला 6500 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात भिवापूर येथे 6400 ते 6770 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे 6450 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)