Cotton Rate : जाणून घ्या, कापसाला कोणत्या मार्केटला किती मिळाला भाव ?

Cotton Rate : दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी शिवारातील कापूस वेचणीला पुन्हा एकदा वेग दिला आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी नियमितपणे सुरू असलेली कापसाची आवक आता थोडी मंदावली आहे. जास्तीतजास्त कापूस विक्रीसाठी येत नाही तोपर्यंत बाजार समित्यांमधील गजबज वाढणार नसल्याचे व्यापारी वर्गाने स्पष्ट केले. आज आपण कोणत्या बाजार समितीत कापसाला किती भाव मिळाला, त्याबाबतची इत्यंभूत माहिती घेणार आहोत.

Which market got the price of cotton?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात विशेषतः विदर्भातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता.20 नोव्हेंबर) कापसाची सुमारे 3,327 क्विंटल आवक झाली. पैकी नागपुरात स्थानिक कापसाची सर्वाधिक 1633 क्विंटल आवक झाली आणि त्यास 7000 ते 7211 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यवतमाळ बाजार समितीत एच-4 मध्यम धागा कापसाची 1094 क्विंटल आवक झाली, त्यास 6950 ते 7200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चंद्रपुरमध्ये स्थानिक कापसाची 400 क्विंटल आवक झाली, त्यास 7050 ते 7325 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. वर्धा येथील बाजार समितीत लांब धागा कापसाची 200 क्विंटल आवक झाली, त्यास 7200 ते 7250 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. एकूण स्थिती लक्षात घेता चंद्रपुरात कापसाला सर्वाधिक 7325 रुपये प्रतिक्विंटलचा भाव सोमवारी (ता.20) मिळाला.

WhatsApp Group
Previous articleBanana News : केळी उत्पादकांसाठी धोक्याची घंटा…नव्या विषाणूजन्य रोगाचा झपाट्याने प्रसार
Next articleBanana Rate : उद्या मंगळवारी (ता. 21 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव