कापसाला गुजरातमध्ये ‘या’ ठिकाणी मिळाला 7370 रूपये प्रति क्विंटल दर

गावशिवार न्यूज | कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात बाजारभाव खालावल्याने संबंधित सर्व शेतकरी खूपच हवालदिल झाले आहेत. अशा या परिस्थितीत लगतच्या गुजरात राज्यात कापसाचे भाव नेमके कसे आहेत, त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. प्राप्त माहितीनुसार गुजरातमध्ये सध्या जेवढी काही कापसाची आवक होत आहे, त्यास बाजारभाव महाराष्ट्राच्या तुलनेत फार जास्त नसले तरी बऱ्यापैकी आहेत. दरम्यान, बुधवारी (ता. 07 फेब्रुवारी) जामनगर जिल्ह्यात कापसाला सर्वाधिक 7370 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. (Cotton Rate)

07 फेब्रुवारी 2024 : गुजरातमधील कापसाचे दर (प्रति क्विंटल)
➡️ राजकोट जिल्हा- 5255 ते 7080 रूपये
➡️ सुरेंद्रनगर जिल्हा- 6000 ते 7000 रूपये
➡️ वडोदरा जिल्हा- 5800 ते 7050 रूपये
➡️ अहमदाबाद जिल्हा- 5425 ते 7230 रूपये
➡️ भरूच जिल्हा- 6100 ते 6500 रूपये
➡️ जामनगर जिल्हा- 6000 ते 7370 रूपये
➡️ जुनागड जिल्हा- 5500 ते 7100 रूपये
➡️ मेहसाणा जिल्हा- 5500 ते 7275 रूपये
➡️ भावनगर जिल्हा- 5500 ते 7090 रूपये

WhatsApp Group
Previous articleगुरूवार (ता. 08 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleपुण्यात मालदांडी ज्वारीला 6000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला दर