Cotton Rate In Gujrat: गुजरात राज्यात कापसाला कोणत्या बाजारात मिळतोय 8,080/- रूपये प्रतिक्विंटलचा भाव ?

Cotton Rate In Gujrat: महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत कपाशीचे लागवड क्षेत्र कमी असले तरी कापूस खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीत गुजरात राज्य नेहमीच पुढे राहिले आहे. तर आज आपण गुजरात राज्यातील प्रमुख बाजारपेठांमधील कापसाचे भाव जाणून घेणार आहोत. प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता. 06 नोव्हेंबर) जुनागढ येथे कापसाला सर्वाधिक 8,080 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता.

In which market is the price of cotton fetching 8080 rupees per quintal in the state of Gujarat?

सोमवारी (06 नोव्हेंबर) गुजरात राज्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असणाऱ्या मेहसाणा जिल्ह्यातील कडी येथे शंकर-6 फाईन व्हरायटीच्या कापसाला 7000 ते 7490 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर विसनगर येथे 6250 ते 7360 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. याशिवाय मोरबी जिल्ह्यातील वंकानेर येथील बाजारपेठेत कापसाला 6750 ते 7685 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. अमरेली जिल्ह्यातील बगसरा बाजारात कापसाला 6500 ते 7535 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. भरूच जिल्ह्यातील जंबूसर (कावी) येथेही कापसाला 6400 ते 6800 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. गांधीनगर जिल्ह्यातील मनसा येथे एच-6 जातीच्या कापसाला 6865 ते 7280 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. राजकोट जिल्ह्यातील जस्दन येथील बाजारात शंकर-6 (B)30MM फाईन जातीच्या कापसाला 6565 ते 7500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर मोरबी येथे 6000 ते 7500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. बनासकांठ जिल्ह्यातील थारा येथे RCH-2 कापसाला 6415 ते 7300 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. जामनगर जिल्ह्यातील ढ्रोली येथे कापसाला 6560 ते 7500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर जाम-खंबालिया येथे 6750 ते 7260 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. जुनागढ येथे कापसाला सर्वाधिक 7200 ते 8080 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. जुनागढ जिल्ह्यातीलच ऊना येथे कापसाला 6300 ते 7230 रूपये प्रतिक्विंटल भाव होता, तर विसावदार येथे कापसाला 6950 ते 7430 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका येथील बाजारपेठेतही शंकर-6 फाईन कापसाला 6500 ते 7260 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

WhatsApp Group
Previous articleOnion Market Rate: राज्यात कांद्याची आवक घटली, सध्या बाजारात मिळतोय ‘असा’ भाव
Next articleSoyabean Market Rate: महाराष्ट्रात सोयाबीनला ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 5,151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव