कापसाला ‘या’ बाजार समितीत 7500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव

Cotton Rate Today : राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाची आवक कमीच असून, बाजारभाव देखील काहीअंशी दबावातच आहे. अपवाद वगळता बहुंताश ठिकाणी कापसाला 7200 रूपये प्रतिक्विंटलच्या आतच भाव मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी सध्या सावध भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

7500 rupees per quintal rate for cotton in this market committee

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता. 16 डिसेंबर) राज्यभरात दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे 17 हजार 354 क्विंटल कापसाची आवक झाली होती. पैकी हिंगणघाट येथे मध्यम धाग्याच्या कापसाची सर्वाधिक 8500 रूपये क्विंटल आवक झाली होती. त्यास 6300 ते 7175, सरासरी 6600 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यानंतर राळेगावात कापसाची 4450 क्विंटल आवक झाली आणि त्यास 6500 ते 7035, सरासरी 6850 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सिंदी (सेलू) येथेही कापसाची 1210 क्विंटल आवक झाली आणि त्यास 6800 ते 7060, सरासरी 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. देऊळगाव राजा येथे कापसाची 900 क्विंटल आवक झाली, त्यास 6800 ते 7055, सरासरी 6950 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. उमरेडमध्ये 705 क्विंटल आवक झाली, त्यास 6400 ते 6930, सरासरी 6750 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. परभणीत 1400 क्विंटल आवक झाली आणि त्यास 7095 ते 7135, सरासरी 7100 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अकोला (बोरगाव मंजू) येथे 121 क्विंटल आवक झाली आणि त्यास सर्वाधिक 7100 ते 7500, सरासरी 7300 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleउसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली, मात्र 17 लाख टनाची अट
Next articleजाणून घ्या, केरळमध्ये केळीला सध्या कसा आहे बाजारभाव ?