कोरडवाहूसाठी उपयुक्त, रस शोषणाऱ्या किडींना प्रतिकारक कापसाच्या वाणाची शिफारस

गावशिवार न्यूज | महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीकडून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने विकसित केलेल्या अमेरिकन कपाशीच्या ‘एनएच 677’ या नव्या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. सदरचा वाण कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त ठरणार असून, जिवाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग आणि रस शोषणाऱ्या किडींना तो प्रतिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. (Cotton Research)

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने विकसित केलेले कपाशी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तीळ तसेच मिरची व टोमॅटोचे वाण अधिसूचित करण्यासाठी केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली आहे. त्यात अमेरिकन कपाशीच्या ‘एनएच 677’ वाणाचा देखील समावेश आहे. अवघ्या 150 ते 160 दिवसांच्या कालावधीत हेक्टरी 12 ते 14 क्विंटल कापसाचे उत्पादन देण्याची क्षमता या वाणाची असून, रस शोषणाऱ्या किडींना प्रतिकारक आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रासाठी त्याची शिफारस करण्यात आली आहे. ‘एनएच 677’ वाणाची अधिसूचना निघाल्यानंतर रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

उपसमितीच्या बैठकीत या वाणांचीही शिफारस
कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सोयाबीनचा ‘एमयूएस 731’ तसेच देशी हरभऱ्याचा ‘परभणी चना 16’, खरीप ज्वारीचा ‘परभणी शक्ती’, तिळाचा ‘टीएलटी 10’, मिरचीचा ‘पीबीएनसी 17’ आणि टोमॅटोचा सरळ वाण ‘पीबीएनटी 20’ हे वाण अधिसूचित करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

WhatsApp Group
Previous articleउत्तर महाराष्ट्रात किमान तापमान पुन्हा घटले, विदर्भात मात्र पावसाळी वातावरण
Next articleगुजरातच्या ‘या’ मार्केटमध्ये कापसाला मिळाला सर्वाधिक 7555 रूपयांचा भाव