Crisis on farmers : पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेंनी शासनाकडे केली ही मागणी

Crisis on farmers : गेल्या काही दिवसांपासून गारपीट व वादळी वाऱ्यांसह पावसाने महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागले आहे. आधीच दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला होता, त्यात अवकाळी पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे.

Supriya Sule made this demand to the government for the farmers who were damaged due to rain

विविध कारणांनी कोरडवाहू तसेच बागायती शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. अनियमित पावसामुळे शेतकरी आधीच दुष्काळाशी दोन हात करीत होता. रब्बी हंगाम तरी चांगला येईल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसानेही झोडपले आहे. दुहेरी संकटामुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सर्वांनीच संवेदनशीलपणे कामाला लागले पाहिजे, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रातील बिकट परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारला विनंती करून तातडीने पीक नुकसानीची पाहणी करून घ्यावी. संपूर्ण शासकीय यंत्रणा पंचनाम्यांसाठी कामाला लावावी आणि केंद्राचा भरघोस निधी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावा म्हणून पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा सुद्धा खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आपण स्वतः संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

WhatsApp Group
Previous articleWheather Update : महाराष्ट्रातील ‘ या ‘ जिल्ह्यात आज पुन्हा गारपीट व वादळी पावसाचा इशारा
Next articleCMO Maharashtra : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश