भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, पाचोरा, जळगावच्या शेतकऱ्यांना 3.25 कोटींची भरपाई

Crop Damage Compensation: नैसर्गिक आपत्तीमुळे नियमित पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान सोसाव्या लागणाऱ्या भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील एकूण 3856 शेतकऱ्यांना सुमारे 3.25 कोटी रूपयांची भरपाई मंजूर झाली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 11 जून 2019 रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबतचा प्रस्ताव जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ समितीकडून 3.25 कोटी रुपये अनुदान तातडीने मंजूर करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण 3856 बाधित शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.

WhatsApp Group
Previous articleरासायनिक खतांचा डोस निम्मे करूनही केळी उत्पादनात कशी झाली भरघोस वाढ ?
Next articleजळगावमध्ये दिवाळीपूर्वीच झेंडुच्या फुलांना किरकोळ बाजारात 80 रूपये किलोचा भाव