मिचौंग चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने; महाराष्ट्रावरील धोका टळला

Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळाने तमिळनाडूसह आंध्रप्रदेशात धडक दिल्यानंतर सगळीकडे हाहाकार माजवला. जमिनीवर आल्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, आता ते पश्चिम बंगालच्या दिशेने गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील संभाव्य धोका टळल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Cyclone Michaung towards West Bengal; The threat to Maharashtra averted

मिचौंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बुधवारी (ता.06) दिवसभर मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आभ्राच्छादित वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झाला. पावसाळी वातावरणामुळे दिवसा गारठा आणि रात्री उकाडा, अशी स्थिती त्या भागात उद्धवली होती. हवामान अभ्यासकांच्या मते मिचौंगने दिशा बदलल्यानंतर गुरुवारी (ता.07) राज्यात सगळीकडे निरभ्र वातावरण तयार होऊन लख्ख सूर्यप्रकाश पडू शकतो. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचेही पुनरागमन होईल. मिचौंग चक्रीवादळाने दिशा बदलल्यामुळे विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीवात जीव आलेला आहे. कारण, राज्यात आधीच अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस
दरम्यान, हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार प्रशांत महासागरातील तापमानात काहीअंशी वाढ झाल्यामुळे हवेचा दाब सुद्धा आता कमी होण्याची चिन्हे आहेत. यापुढील काळात जास्त हवेचा दाब असणारे वारे आपल्यासोबतचे बाष्प हिंद महासागरात घेऊन जातील. परिणामी, वातावरणातील गारठा वाढून हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा कडाका पुन्हा जाणवेल. उन्हाळा देखील फार तीव्र राहणार नाही. साधारण मार्चपर्यंत वादळे शमतील आणि पुढे पावसाळ्यात कोणताही अडथळा शिल्लक न राहिल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडेल, असेही हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या गुरूवारी (ता.07 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव.
Next articleशासनासह शेतकऱ्यांना फसविणाऱ्या जैव उत्पादनांच्या कंपन्यांचे परवाने रद्द