Devendra Fadnavis : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आता उपलब्ध केल जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे. यासोबतच उद्योग, शेती, उर्जा, पर्यचन क्षेत्राला बळकटी देऊन विदर्भाचा विकास साधण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.
Farmers of the state will get electricity for 12 hours a day: Devendra Fadnavis
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आ.एकनाथ खडसे, मनीषा कायंदे, महादेव जानकर, अमोल मिटकरी, प्रवीण दरेकर, अनिल परब, प्रवीण दटके, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, सुधाकर आडबाले, किरण सरनाईक, अभिजित वंजारी, नीलय नाईक आदींनी शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शेतीपंपांना दिवसा 12 तास वीज देण्याची घोषणा केली.
नागपुरात सौरऊर्जेसाठी 18,000 कोटींची गुंतवणूक
विदर्भात समृद्धी महामार्गामुळे उद्योग विस्ताराला आता चालना मिळाली आहे. नागपुरात सौरउर्जेसाठी सुमारे 1800 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून मोठे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. याशिवाय विदर्भातील 26 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांसाठी सुमारे 50 हजार 595 कोटी रूपयांचे देकार पत्र दिले आहेत. कोनसरीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.