राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोना, पुण्यातील घरी क्वारंटाईन

Dhanajay Munde : देशभरात पुन्हा कोरोनाचे रूग्ण आढळत असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, मंत्री श्री. मुंडे यांना त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू झाले आहेत.

State Agriculture Minister Dhananjay Munde is also quarantined at home in Pune due to Corona

नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी अधिवेशन आटोपताच त्यांची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर लगेचच मंत्री श्री.मुंडे यांच्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोनाचा उपविषाणू असलेल्या जेएन 1 मुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारी एकाच दिवसात सुमारे 752 कोरोना बाधीत रूग्ण आढळले होते, त्यापैकी चार रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या संपूर्ण भारतात 3420 कोरोना बाधीतांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या सोमवारी (ता. 25 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleदेशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे नाणे चलनात येणार