Education News : राज्यातील शिक्षकांची 80 टक्के रिक्त पदे लवकरच भरणार- शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

Education News : राज्यातील शिक्षकांची 50 टक्के रिक्त पदे सुरुवातीला भरली जातील, आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर 80 टक्के रिक्त पदांची भरती सुद्धा लगेचच करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी‌ जिल्ह्यातील फैजपूर (ता.यावल) येथे रविवारी (ता.19) दिली.

80 percent of the vacant posts of teachers will be filled soon

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 62 व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के.पाटील, मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले, विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते.

54 मुख्याध्यापकांचा आदर्श पुरस्काराने गौरव

टप्पा अनुदानाच्या बाबतीत 31 डिसेंबरपूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टलवरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील. सन 2005 पूर्वी नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षक पुढची पिढी घडवतो त्यांना समाजात मान मिळाला पाहिजे. समूह शाळा, दत्तक शाळा याचे उद्देश्य कोणतीही शाळा बंद करणे हे नसून सर्व शाळांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हे आहे. सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे, असे झाले तर केंद्राकडून अनेक सुविधा सर्व शाळांना मिळतील. पुढील वर्षापासून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे तसेच कृषी विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या 54 मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

WhatsApp Group
Previous articleJalgaon Crime News : अमळनेर तालुक्यात वाळू तस्करांकडून तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
Next articleBanana Rate : उद्या सोमवारी (ता. 20 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव