शास्त्रज्ञांकडून इलेक्ट्रॉनिक माती विकसित, आता ही काय नवीन भांडगड आहे ?

Electronic Soil : जर तुम्हाला कोणी सांगितले की पिकांची वाढ 15 दिवसांतच दुप्पटीने करून दाखवतो, तर तुम्ही त्या व्यक्तीला थेट वेड्यातच काढाल. पण हे शंभर टक्के खरे आहे. स्वीडनमधील लिंकोपिंग युनिव्हर्सिटीने त्यासंदर्भात मोठे संशोधन केले असून, हायड्रोपोनिक शेतीसाठी विद्युत प्रवाहकीय शेतीचा थर शास्त्रज्ञांच्या टीमने तयार केला आहे. ज्याला त्यांच्याकडून ई-सॉईल संबोधले गेले आहे.

Electronic soil developed by scientists, now what is this new battle?

जगाची लोकसंख्या जितक्या झपाट्याने वाढते आहे, हवामानात जितक्या झपाट्याने बदलते आहे, तितक्या झपाट्याने आपण फक्त पारंपरिक शेतीच्या माध्यमातून पृथ्वीतलावरील लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यास अपूर्ण पडत आहोत. त्यामुळे हायड्रोपोनिक्स सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत तयार करावा लागणार आहे. ज्यामाध्यमातून शहरी भागातही नियंत्रित वातावरणात पिके घेणे शक्य होणार आहे, असा दावा लिंकोपिंग युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक एलेनी स्टॅव्ह्रिनिडो यांनी केला आहे. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार विद्युत वाहक मातीत लागवड केलेल्या बार्लीच्या रोपांची 15 दिवसातच 50 टक्के वेगाने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. कारण, त्या रोपांची मुळे ही विद्युत प्रवाहामुळे उत्तेजित झालेली होती.

मातीशिवाय शेतीला भविष्यात मोठी संधी

भरमसाट रासायनिक खते तसेच किटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे आज शेतांमधील मातीचे आरोग्य बिघडले आहे. सुपिक माती दिवसेंदिवस नापीक होत असताना, पिकांच्या उत्पादनावर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर मातीशिवाय शेतीची संकल्पना नियंत्रित वातावरणात रूजू लागली आहे. त्यालाच हायड्रोपोनिक शेती असेही म्हणतात. कोकोपीटसारख्या माध्यमांचा वापर करून पिकांना फक्त पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये पुरवून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन हायड्रोपोनिक शेतीत घेतले जाते. ई-सॉईल तंत्राची जोड दिल्यानंतर कमी कालावधीत पिकांचे भरघोस उत्पादन घेणे शक्य होणार असल्याने भविष्यात हायड्रोपोनिक शेतीला आणखी जास्त चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत केळीचे भाव दोनच दिवसात निम्म्याहून कमी झाले
Next articleउद्या गुरूवारी (ता. 28 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव