गावशिवार न्यूज | सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 5 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज शेजारचे मैदानावर करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे. (Faizpur Agriculture Exhibition)
फैजपूर शहरात आयोजित केलेल्या या प्रदर्शनात नामांकित कंपन्यांचे बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक व तुषार सिंचन यंत्रणा, कृषी यंत्रे आणि अवजारे यांचे स्टॉल लावले जाणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक हे कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शनात महिला बचत गटांचे विशेष दालन असेल. नामांकित कंपन्या व कृषी संस्था यांचा कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे. अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे. स्टॉल बुकींग करण्यासाठी 9970661546, 9420287117, 9921039088 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2024/01/Thumbnail-147-jpg.webp)
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)