मकरसंक्रातीपासून राज्यातील रेशन दुकांनावर मोफत साडी वाटपाचा शुभारंभ

Free Saree Distribution Scheme : राज्यातील दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय शिधापत्रिकाधारक सुमारे 24 लाख 58 हजार 747 कुटुंबातील महिलांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची मकरसंक्रांतीपासून अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी पुरवणी योजनांमध्ये सुमारे 125 कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. 365 रुपये किमतीच्या सिल्क आर्ट साड्यांमध्ये 5 रंगांचे पर्याय असतील आणि महिलांना रेशन दुकानावर प्रत्येकी एक साडी मिळेल.

Free saree distribution started at ration shops in the state from Makar Sankranti

लोकसभेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मोफत साडी वाटपाची योजना सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ ठराविक सणांच्या दिवशी देण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रातीला या योजनेचा शुभारंभ केला जात आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी करताना अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडी मोफत दिली जाईल. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार 747 इतकी आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरूनच शासनाने मोफत साडी वाटपाची योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मोफत साड्यांचे वाटप हे राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानांवर केले जाणार आहे. मोफत साडी वाटपाच्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला नोडल संस्था म्हणून नेमण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत यंत्रमाग सहकारी संस्था तसेच लघू उद्योग व मध्यम उद्योगांकडून शासन साड्यांचे उत्पादन करून घेत आहे. या साड्यांची गुणवत्ता तपासणी शासन पातळीवर करून घेतली जाणार असल्याचेही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group
Previous articleशासन प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्र बसविणार : कृषीमंत्री धनंजय मुंडे
Next articleउद्या गुरूवारी (ता. 21 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव