शासन बांबू लागवडीसाठी देणार अनुदान, मधाचे गाव योजनाही राबविणार

गावशिवार न्यूज | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 05) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासह मधाचे गाव योजना राबविण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे. ( Government Decision)

शासनाने सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले काही महत्वाचे निर्णय असे
➡️ उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
➡️ मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मध उद्योगाला बळकटी मिळू शकेल.
➡️ मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही.
➡️ राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असूव, सुमारे दोन लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण केले जाणार आहेत.
➡️ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा शासन संवेदनशील असून, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षांवरील नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे.
➡️ राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबविले जाईल, ज्यामाध्यमातून पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर दिला जाईल.
➡️ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी उपक्रमाला चालना देण्यात येणार आहे.
➡️ बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करण्यात येणार असून, त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
➡️ शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार केला जाणार असून, नवीन इमारत उभारणी होणार आहे.
➡️ धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागितली जाणार आहे.
➡️ सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्यात येणार आहेत.
➡️ स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
➡️ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देऊन पतसंस्थांना मजबूत केले जाणार आहे.
➡️ कोंढाणे लघु प्रकल्प कामाच्या जादा खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
➡️ तिवसे लघू पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.
➡️ नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम लागू केला जाणार आहे.
➡️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहे.
➡️ कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष केले जाईल.
➡️ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय स्थापन होईल.
➡️ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण केले जाईल.

WhatsApp Group
Previous articleराज्यात हरभऱ्याला ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर
Next articleमुंबई बाजार समितीत केळीने काढले नाव, 4000 रूपये क्विंटलचा मिळाला भाव