गावशिवार न्यूज | राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कळमडू, राजमाने, ब्राम्हणशेवगे, विसापूर, देवळी या गावातील तलावांच्या विकासाला शासनाने मान्यता दिली आहे. संबंधित सर्व तलावांच्या संवर्धनासह वनीकरण, सोलर पथदिवे बसविणे, निर्माल्यकलश आदी कामांसाठी तब्बल 18 कोटी 28 लाख रूपये निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यापैकी 05 कोटी रूपयांचा निधी प्रथम हप्त्यापोटी वितरीत होणार आहे. (Government Resolutions)
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर प्रस्तावाच्या आधारे कळमडू येथील तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सुमारे 3 कोटी 83 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी रूपयांचा निधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर प्रस्तावाच्या आधारे देवळी येथील तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सुमारे 3 कोटी 80 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर प्रस्तावाच्या आधारे ब्राम्हणशेवगे येथील तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सुमारे 4 कोटी 55 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर प्रस्तावाच्या आधारे राजमाने येथील तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सुमारे 2 कोटी 99 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर प्रस्तावाच्या आधारे विसापूर येथील तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सुमारे 3 कोटी 11 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)