शासन राज्यातील दुष्काळ सदृश्य 1245 महसूल मंडळात सुरू करणार चारा डेपो

गावशिवार न्यूज । खरीप हंगाम 2023 च्या अनुषंगाने राज्यातील सुमारे 1245 महसूल मंडळात शासनाने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. संबंधित सर्व महसूल मंडळात आता चारा डेपो सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. साधारणपणे 31 ऑगस्टपर्यंत चारा डेपो सुरु राहणार आहेत. त्याचा लाभ चारा टंचाईला तोंड देणाऱ्या पशुपालकांना होऊ शकणार आहे. (Government Resolutions)

शासन निर्णयानुसार, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती आदी घटकांचा विचार करून 1245 महसूल मंडळात यापूर्वीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय जमीन महसुलात सूट देऊन पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलाबात 33.5% सूट, विद्यार्थ्यांना शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी काही उपाययोजना दुष्काळ सदृश्य भागात लागू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता चारा डेपो सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत चारा डेपो सुरू राहणार असल्याने पशुपालकांना दिलासा मिळू शकणार आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्याच्या ‘या’ भागात आज जोरदार पावसाचा अंदाज, खान्देशची कशी राहील स्थिती ?