‘माविम’च्या महिला बचतगटांनाही फिरता निधी देण्यासाठी हालचाली सुरू

Government Scheme : राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’ अंतर्गत कार्यरत महिला बचतगटांना लवकरच फिरता निधी आणि समूह संसाधन व्यक्तींना मानधन देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदप्रमाणे ‘माविम’च्या बचतगटांना फिरता निधी व समूह संसधान व्यक्तींना मानधन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनीही दिले आहेत.

Movements are also underway to provide revolving funds to the women’s savings groups of ‘Mavim’

महिला आर्थिक विकास महामंडळ हे राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. माविमच्या माध्यमातून बचतगटांचे फेडरेशन लोकसंचालित साधन केंद्रांना तांत्रित सहाय्य उपलब्ध केले जाते. याव्यतिरिक्त महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे सोपे जावे म्हणून आता उमेदप्रमाणे काही चांगल्या उपक्रमांशी माविमच्या बचतगटांना जोडले जाणार आहे. उमेद अभियानातील बचतगटांप्रमाणे ‘माविम’च्या बचतगटांनाही लाभाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने आवश्यक तो प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्याच्या बाबतीत हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या बैठकीतही त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘माविम’च्या स्वयंसहाय्यता महिला बचतगटांना लाभ देण्यासाठी त्यांची माहिती उमेदच्या पोर्टलवर टाकणे आवश्यक असल्याने त्या कार्याला सुद्धा आता गती देण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश देखील संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत, अशीही माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांचे व्यवस्थापन करण्यासह महिलांमधील आत्मविश्वास वृद्धींगत करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत असते. याशिवाय महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि बाजारपेठांमध्ये समन्वय साधण्याचे काम महामंडळ करीत असते. महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन करून त्यांचा उद्योजकीय विकास करण्यातही या महामंडळाचा मोठा राहिला आहे.

WhatsApp Group
Previous articleमुंबई, पुण्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शासन दरवर्षी देणार 60 हजार
Next articleराज्यात जेऊरमध्ये निच्चांकी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, थंडीची लाट