राज्यातील ‘या’ जिल्ह्यात नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार

Govt Resolutions : नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत राज्यात आणखी एक नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात कार्यान्वित होणार आहे.

A new degree veterinary college will be started in the state

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार सद्यःस्थितीत देशात पशुवैद्यकांची मोठी कमतरता असून, साधारण सन 2035 पर्यंत सुमारे 1 लाख 25 हजार एवढ्या पशुवैद्यकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अनुसंधान परिषदेने शासकीय/खासगी स्तरावर नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शिफारस देखील केली आहे. याअनुषंगाने सध्या कार्यरत असलेल्या पशुवैद्यक महाविद्यालयांमधून निर्माण होणारे पशुवैद्यक मनुष्यबळ तसेच राज्यातील पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यात सावळी विहीर खुर्द, शिर्डी येथे सुमारे 75 एकर क्षेत्रावर नवीन पदवी पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 276 जागांची होणार भरती

अहमदनगर जिल्ह्यात नव्याने होत असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी नियमित स्वरूपातील शिक्षकांची 96 पदे तसेच शिक्षकेत्तर संवर्गातील 138 पदे, त्याचप्रमाणे बाह्यस्त्रोतांद्वारे शिक्षकेत्तर संवर्गातील भरावयाची 42 पदे, अशा एकूण 276 पदांना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढील 5 वर्षांकरीता मणुष्यबळ वेतनाच्या तरतुदीकरीता सुमारे 9748.93 लक्ष रूपये आणि कार्यालयीन खर्चासाठी सुमारे 971 लक्ष रूपये, अशा एकूण सुमारे 10719.3 लक्ष रूपये एवढ्या आवर्ती खर्चालाही शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इमारत बांधकामासाठी 34613 लक्ष रूपये, उपकरणे खरेदीसाठी 3850 लक्ष रूपये, वाहन खरेदीसाठी 76 लक्ष रूपये खर्चाला देखील शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या रविवारी (ता. 03 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleहुश्श…अखेर राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी झाला