Govt Scheme : डाक विभागाची महिलांच्या सन्मानार्थ बचत पत्र योजना किती फायद्याची ?

Govt Scheme : राज्यातील सर्वच पोस्ट कार्यालयात महिलांच्या सन्मानार्थ बचत पत्र योजनेची खाती उघडण्याची विशेष मोहिम नारी शक्ती विशेष अभियानांतर्गत सध्या राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ महिला व मुली घेऊ शकतात आणि त्यांना वयाची कोणतीही अट नसल्याचे डाक विभागाने म्हटले आहे.

How beneficial is the savings scheme of postal department in honor of women?

भारतीय डाक विभागामार्फत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. महिला व आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठीही भारत सरकार योजना राबविते. त्यानुसार नुकतीच भारत सरकारने भारतीय डाक विभागामार्फत देशातील महिलांचा गुंतवणुकीत सहभाग वाढविण्यासाठी व महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत पत्र योजना (एमएसएससी) सुरु केली आहे. या योजनेचे महिलांचे खाते उघडण्यासाठी डाक विभागातर्फे नारी शक्ती विशेष अभियान देखील राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व मुलींनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात भेट देऊन महिला सन्मान बचत पत्रामध्ये गुंतवणूक करावी. शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावात तसेच नजिकच्या पोस्ट कार्यालयात अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

अशी आहे महिलांची बचत पत्र योजना
◼️ ही योजना फक्त महिला व मुलींना लागू असून वयाची कोणतीच अट नाही.
◼️ योजनेत व्याज 7.5 टक्के (चक्रवाढ व्याज), किमान गुंतवणूक रक्कम रुपये 1 हजार रूपये आणि कमाल गुंतवणूक 2 लाख रूपये करता येईल.
◼️ मुदत 2 वर्ष असली तरी हे खाते 6 महिन्यानंतर मुदतपूर्व बंद करता येते.
◼️ रुपये 10 हजारासाठी परिपक्वता रक्कम 11 हजार 602 रूपये इतकी आहे.
◼️ एक वर्षांनंतर जमा रकमेच्या 40 टक्के रक्कम खातेधारकांना काढता येते.

WhatsApp Group
Previous articleMaldandi Jowar : पुण्यात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 6900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव
Next articleMahaparinirvana day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर ते मुंबई 10 विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार