गावशिवार न्यूज | शेतकऱ्यांनी परिपक्व पिकाच्या काढणीला वेग दिल्याने राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. सध्या राज्यभरात हरभऱ्याची दैनंदिन सरासरी तीन ते चार हजार क्विंटलपर्यंत आवक होत असून, त्यास सरासरी 5100 ते 5900 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. (Gram Market Rate)
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी (ता. 04 फेब्रुवारी) राज्यात आवक झालेल्या लाल प्रकारातील हरभऱ्याला सर्वाधिक दर औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. त्याठिकाणी लाल हरभऱ्याची 303 क्विंटल आवक होऊन त्यास 5701 ते 6251 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. खालोखाल उदगीरमध्ये लाल हरभऱ्याची 260 क्विंटल आवक झाली, त्यास 5800 ते 6025 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. दौंडमध्ये हरभऱ्याची 05 क्विंटल आवक होऊन 4800 ते 5855 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. वरोरा-शेगावमध्ये 129 क्विंटल आवक झाली आणि त्यास 5200 ते 5480 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. वरोरा- खांबाडा येथे 251 क्विंटल आवक झाली आणि त्यास 5050 ते 5300 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. बुलडाण्यात हरभऱ्याची 30 क्विंटल आवक झाली आणि त्यास 4000 ते 4500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. भिवापूरमध्ये 35 क्विंटल आवक झाली आणि त्यास सरासरी 5500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. वरोरा येथेही हरभऱ्याची 304 क्विंटल आवक झाली, त्यास 5200 ते 5411 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)