राज्यात हरभऱ्याच्या या वाणाला सरासरी 12,800 रूपये प्रति क्विंटलचा भाव

Gram Rate : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या काढणीला आता वेग दिला आहे. त्यामुळे राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक वाढली असून, विविध प्रकारच्या वाणांना चांगला भाव देखील मिळत आहे. पैकी काबुली वाणाला शुक्रवारी (ता. 16) किमान 12000 रूपये, कमाल 13500 रूपये आणि सरासरी 12800 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

महाराष्ट् राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी बुलडाणा येथे हरभऱ्याच्या काबुली वाणाची 260 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 12800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. जळगावमध्ये बोल्ड वाणाची 13 क्विंटल आवक झाली, त्यास 7600 ते 7800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावतीमध्ये लोकल हरभऱ्याची 1776 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 6655 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बुलडाण्यात लाल वाणाची 40 क्विंटल आवक झाली, त्यास 5400 ते 5600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. धाराशिव काट्या हरभऱ्याची 60 क्विंटल आवक झाली, त्यास 5500 ते 5900 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. धुळ्यात संकरीत हरभऱ्याची 60 क्विंटल आवक झाली, त्यास 5750 ते 6100 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हिंगोलीत लोकल हरभऱ्याची 55 क्विंटल आवक झाली, त्यास 5100 ते 5700 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. जळगावमध्ये चाफा हरभऱ्याची 270 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 6543 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. परभणीत गरडा वाणाची 50 क्विंटल आवक झाली, त्यास 5619 ते 5915 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यवतमाळमध्ये लाल हरभऱ्याची 440 क्विंटल आवक झाली, त्यास 4600 ते 4800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोलापुरात लोकल हरभऱ्याची 57 क्विंटल आवक झाली, त्यास 6100 ते 6600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleराज्यभरात सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले
Next articleमराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना